Thursday 20 October 2011

                                                    जय गुरुदेव    
          मागील लेखात आपण पहिले कि आपल्या शरीरात देव आहे हे सिद्ध झाले. म्हणजे आपल्या देहात जसा जीव आहे तसा देवही आहे. जीवामुळे देह जिवंत राहतो तर देव जीवाला ज्ञान पुरवितो. जीव व देव हे दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीत. कारण, जीव व देव निराकार आहेत. जीव चैतन्ययुक्त आहे तसाच देवही चैतन्ययुक्त आहे. जीव अमूर्त आहे देवही अमूर्त आहे. मग जीवात व देवात फरक कोणता  ? जीव हा एकदेशीय आहे. कारण तो या देहातून त्या देहात जातो. देव विश्वव्यापी आहे; सर्वत्रग: सर्वव्यापी आहे. जीव अल्पज्ञ आहे; देव सर्वज्ञ आहे. जीव अज्ञानी आहे; देव ज्ञानी आहे.जीव अज्ञानी असल्यामुळे देव जीवाला ज्ञान पुरवितो. अशाप्रकारे, आपल्या देहास जसा जीवाचा तसाच देवाचाही अत्यंत उपयोग आहे.
               आपल्या शरीरात असलेला आत्मा हाच खरा देव आहे. आमच्या विद्वान साधुसंतांनी त्याला त्याच्या विविध कामावरून विविध नावे दिलेली आहेत. ती अशी :-

                नारत नांदतो तो नारायण म्हणजेच आत्मा.
                                                   आत्मा नारायण सर्वाघटी आहे  l
                                                   आपणामध्ये काय कळो नये  ll 
             तो आत्मा आमचे स्वतः:चे देहात ओतप्रोत  सामावलेला असून तो आमच्यात इतका रमलेला आहे, कि आमच्या रोमारोमात तो भरून राहिलेला आहे. म्हणून त्याला 'आत्माराम' असे नाव दिलेले आहे.
          विश्वात व्यापलेला परमात्मा अलक्ष असलेला लक्षात आणण्यासाठी ठशाच्या रूपाने आमच्या देहात आहे.'विश्वात्मक ठसलेले लक्ष 'म्हणून 'विठ्ठल' म्हटले आहे. कलेवराचा करता म्हणून त्यास 'कृष्ण' म्हटले आहे. शवाला जिवंत ठेवतो तो 'केशव'. इंद्रियरुप अकरा गायींना पाळतो, वळवतो तो 'गोपाळ' म्हणजेच आत्माराम होय.
          ज्या इमारतीत देव राहतो तिला देऊळ असे म्हणतात. देह हि देखील साडेतीन हाताची इमारत आहे व तिच्यात आत्माराम हा देव राहतो म्हणून साधुसंतांनी या देहास देऊळ म्हटले आहे;-
                               देह देवाचे देऊळ l  आत बाहेर निर्मळ ll  

जीवन कलेची साधना या सदगुरू हंबीर बाबा यांच्या ग्रंथातील उतारा आहे.                                                                                              
                                                                                                                                क्रमश:

Tuesday 18 October 2011

जय गुरुदेव ,
               मागील लेखात आपण पहिले कि या सर्व क्रिया जीवामार्फत हि चालत नाही कारण जीव हा निद्रेच्या सुखानंदात निमग्न असतो. तर मग आम्ही असे हि म्हणून शकतो कि या सर्व क्रिया शरीरातील मेंदू मार्फत चालत  असतात. कारण शाळा - कॉलेजातील पुस्तकातून हेच शिकविले जाते, कि मेंदू हा  शरीराचा राजा आहे व मेंदूच ह्या सर्व क्रिया करतो. मेंदू हा शरीराचा राजा म्हटल्यावर इंद्रिये हि प्रजा ठरते. आता आपण विचार करा. मेलेल्या माणसाच्या डोक्यात मेंदू असतोच. म्हणजेच राजा आहे. इंद्रिये म्हणजे प्रजा आहे. असे असताना (इंद्रियाची कामे) व्यवहार का बरे बंद पडला ? तो राजा (मेंदू) का बरे आता गप्प पडला ? तर मग आपण म्हणतो कि तसे नाही. काही तरी शरीरातून निघून गेले ! मग, ते ;जे काहीतरी' निघून गेले तो राजा कि मेंदू राजा ?
              काही विद्वान लोक  म्हणतात, "वरील सर्व क्रिया ह्या अनिच्छावर्ती क्रिया' आहेत व याच अनिच्छावर्ती क्रियेमुळे अन्नाचे पचन होते, रस-रक्त -मांसशक्ती बनते." आता याचाच जरा विचार करा, इच्छावर्ती क्रिया-हातापायाची हालचाल, डोळ्याची उघड्झाक , तोंडाची हालचाल या क्रिया- आपण आपल्या (जीवाच्या) इच्छाशक्तीमार्फात करतो म्हणून त्यांना इच्छावर्ती क्रिया असे नाव दिले. ज्या सर्व क्रिया जीवा मार्फत (जीवाच्या इच्छेमार्फात ) चालतात त्यांना इच्छावर्ती क्रिया म्हणतात. कारण क्रिया इच्छेशिवाय घडतच नाही. क्रिया म्हटले म्हणजे कर्त्याची इच्छा आलीच. तेंव्हा, असे असताना  अनिच्छावर्ती क्रिया असतील तरी कशा ? असं वाटते कि त्या विद्वानांना अनिच्छावर्ती क्रियेचा कर्ताच सापडला नसेल. म्हणूंन असे म्हणणे सुद्धा पूर्ण पणाचे वाटत नाही. नव्हे ते साफ चुकीचेच आहे. कारण वरील सर्व क्रिया देखील इच्छावर्तीच आहे, व त्या सर्व त्या देवा मार्फात चालेल्या क्रिया आहेत. अन्नाची पचनक्रिया करणे, रस-रक्त-मांस बनविणे, शक्ती देणे, देहाचे संरक्षण, संगोपन, संवर्धन करणे या सर्व क्रिया ज्या चैतन्यशक्ती मार्फत चालतात ती चैतन्य शक्ती म्हणजेच देव होय. संत तुकाराम महाराज अगदी सोप्या भाषेत सांगतात ,-
                         ०१.  चाले हे शरीर कोणाचिया सत्ते  l 
                                 कोण बोलविते हरिविण  ll 
                                 देखवी ऐकवी एक नारायण l 
                                 तयाचे भजन चुकू नका ll       
                         ०२. आत्मा नारायण सर्वाघटी आहे l 
                               (मग) आपणामध्ये काय कळो नये ll 
तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
                         ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान  l
                         सर्व घाटी पूर्ण एक नांदे ll  
 उपरिनिद्रिष्ट संतांच्या सिद्धांतावरून, आपल्या शरीरात देव आहे, हे सिद्ध होते.
क्रमश :      

Sunday 16 October 2011

जीवन कलेची साधना - खरा देव

जय गुरुदेव 
          परमेश्वर प्राणि-पदार्थात ओतप्रोत भरलेला असून तो आपल्या मानवी देहात हि  वसलेला आहे. या विधानामुळे आपणास शंका येईल,कि तो एवढा मोठा, विश्वात भरलेला अनंत (परमेश्वर) आपल्या इवल्याशा मानवी देहात वसतो, हे खरे कसे मानावे?तर जरा विचार करा :-
          आपला मानवी देह हा कोणत्यातरी एका अदृश्य चैतन्यशक्तीवर जिवंत राहिलेला आहे. ती चैतन्यशक्ती जेव्हा हा देह सोडून जाते तेंव्हा तो देह प्रेत होतो   (अर्थात मनुष्य मरतो). तेंव्हा, मानवी देहात जी चैतन्यशक्ती चेतना उत्पन्न करून देहास जिवंत ठेवते तिलाच विद्वानांनी 'जीव' असे नाव दिले. हा जीव जाताना व येताना दिसत नाही. जे वस्तू डोळ्याने दिसत नाही तिला अमूर्त वा निराकार वस्तू म्हणतात आणि ती वस्तू निराकार असल्यामुळे आपल्याला डोळ्याने दिसत नाही. कारण, आपल्या डोळ्यातील दृष्टी हि सृष्टी (आकारी पदार्थ ) पाहण्याच्या लायकीची आहे. यावरून, तो जीव निराकार आहे, हे सिद्ध होते.
         आपल्या देहात जीव आहे. करारन, याक जीवामुळे देह जिवंत राहतो. पण 'आपल्या देहात देव राहतो' हे कसे काय ? आता या प्रश्नाचा विचार करू .
           जेंव्हा आपण जागे असतो तेंव्हा आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, हातांनी देवाण - घेवाण करतो व पायांनी चालतो. पण, जेंव्हा आपण भोजन केल्यानंतर रात्री अंथरुणावर गाढ झोपी जातो त्या गाढ झोपेतील स्थितीबद्दल विचार करूया . तर गाढ झोपेत या सर्व क्रिया बंद असतात. तर या सर्व क्रिया का बरे बंद असतात, तर उत्तर असे मिळते कि या सर्व क्रिया जीवामार्फत चाललेल्या असतात. आणि जीव हा निद्रेच्या सुखानंदात निमग्न होतो , त्यावेळी ह्या सर्व क्रिया इंद्रियाकडून  करवून घ्यायला इंद्रियांचा कोणी 'मालक' असा कोणीच नसतो. ज्या प्रमाणे मालक झोपी गेला, म्हणजे त्याचे सर्व नौकर झोपतात. तद्न्याय जीवरूपी मालक झोपला म्हणजे इंद्रीयरूपी नौकर स्वतःची कामे सोडून देतात. त्या गाढ झोपेत जीवाला देहाची आठवण सुद्धा रहात नाही. आपणा सर्वाना या गोष्टीचा नित्य अनुभव येतो. कि जेंव्हा आपण गाढ झोपी जातो तेंव्हा आपल्या स्वतःच्या देहाची आपल्याला मुळीच आठवण राहत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या अंगावरील सर्व अलंकार चोर चोरून घेवून जातो तरी हि ते आपणा स्वतःला काही समजत नाही, ज्या घरात आपण झोपतो त्या घराची आठवण आपणास नसते ; एवढेच नव्हे तर त्या गाढ निद्रेत ज्या देहरूपी घरात जीवरूपी आपण झोपतो त्या देहरूपी घराची सुद्धा आपणास आठवण नसते. आता विचार करू, आपण जेवण करून झोपलो होतो. त्या खाल्लेल्या अन्नाची  पचनक्रिया त्या गाढ झोपेत ही चालू असते, त्या अन्नापासून अन्नरस व अन्न्रासाचे रक्तात रुपांतर व रक्तातून मासादी धातूंची उत्पत्ती  ह्या क्रिया चालू असतात, म्हणजे क्रिया म्हटले कि कर्ता आलाच पाहिजे. कारण कर्त्या शिवाय क्रिया होत नाही. तेंव्हा या सर्व क्रिया आपल्या देहात कोण करतो ?
        आपण म्हणू या जीव करतो, परंतु आपण पहिले कि जीव तर निद्रेच्या सुखानंदात निमग्न असतो, व त्याला तर देहाची व इंद्रीयांचीही  आठवण नसते तर मग या सर्व क्रिया तो कसा काय करू शकेल ?
                                                                                                                                         क्रमश :         

.       



Friday 14 October 2011

खरा देव :- क्रमश :

खरा देव :- क्रमश :
जगाच्या अगदी आरंभापासून दोन ओघ निर्माण झाले आहेत. त्यातील पहिला ओघ सत्य (परब्रम्ह), अविनाशी, निराकार,निर्गुण, केवळ,अचल,साक्षीभूत पुरुष आणि दुसरा ओघ असत्य म्हणजे माया, महततत्व , महधोनी,गुणमयी, नाशवंत, प्रकृती होय .यातील पहिला ओघ जे सत्य (सत) तोच 'खरा देव' आहे. त्याच ख-या देवासबंधी आपण विचार करू व नंतर खोटा देव विचारात घेऊ.
                           ०१. तो खरा देव कोण ? कोठे राहतो ? तो कसा आहे ?
                            ०२. त्याचेकडे आम्ही कसे जावे ?
                            ०३. त्याची आम्ही ध्यान- धारणा, भक्ती कशी करावी ?
                            ०४. आणि जर आम्ही त्याचेकडे गेलो तर त्याची प्राप्ती होईल का नाही ?
हे प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतील . तेंव्हा आपण या सर्व प्रश्नांचा क्रमाने विचार करूया :-
                       ०१. आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असलेले अध्यात्म् ज्ञानाची शिकवण देणारे वेद चार आहेत. त्या चारही वेदांची देवाविषयी एकवाक्यता आहे. विश्वीं विश्वम्बर l बोले वेदांताचे  सार  ll     देव विश्वात ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून, त्या विश्वव्यापी परमेश्वराला चारही वेदांनी 'विश्वंभर' हि संज्ञा दिलेली आहे. आता, शास्त्रे सहा आहेत व त्या सहाही शास्त्रांचा देवाविषयी एकाच सिद्धांत आहे. जगी जगदीश l  ऐसे शास्त्रे वादाती सावकाश ll  तो परमेश्वर जगाच्या सर्व दिशांत वसलेला आहे. आणि म्हणूनच सहा शास्त्रांनी सिद्ध केले, कि जगात 'जगदीश' वसलेला आहे. पुराणे आठरा आहेत व ती आठरा पुराणे परमेश्वराचे व्यापकत्वाबद्दल एकमुखाने बोलतात, व्यापिले हे नारायणे l  ऐशी गर्जती पुराणे ll    
     यावरून, परमेश्वराचे व्यापकत्वाबद्दल वेद, शास्त्रे,पुराणे  या सर्वांचे एकमत आहे. आता, साधुसंतांचे परमेश्वराबद्दल काय मत आहे, ते पाहू. संत म्हणतात, जनी जनार्दन l  ऐसे बोलती वचन  ll  तो परमेश्वर सर्व जनतेत तुडुंब भरलेला आहे. जनता हे जनार्दनाचे सगुण रूप आहे आणि म्हणूनच साधुसंतांनी त्या परमेश्वराला 'जनार्दन' म्हटले आहे. तेंव्हा, विश्वंभर, जगदीश, नारायण व जनार्दन हि सर्व नावे त्या एकाच परमेश्वराची आहेत, हे वरील सिद्धांतावरून सहज सिद्ध होते.
 आता तो, देव कोठे राहतो? तो कसा आहे ? याकडे  पुढील उता-यात पहा
जीवन कलेची साधना या ग्रंथातील उतारा 
सदगुरु समर्थ श्री हंबीर बाबा यांचे द्वारे लिखित :-
 
        
 

Tuesday 11 October 2011

जीवन कलेची साधना - खरा देव

आज आपल्या समाजात असंख्य दैवतांची प्रचंड गर्दी झालेली दिसते. कोणी रामाची भक्ती करतो तर कोणी कृष्णाची भक्ती करतो, कोण विठोबाचा धावा करतो तर कोण पांडुरंगाला हाका मारतो , कोणी म्हसोबाला भाजतो तर कोणी गणपतीला पुजतो, अशाप्रकारे या सर्व सैवातांची भक्ती करण्यामध्ये आपला समाज इतका गुंतला आहे कि त्याला खरे काय? व खोटे काय? याचा विचार करायला सुद्धा वेळ बाही, बरे साधू-संतानी काय शिकविले आहे , याचाही मुली विचारच करत नाही. संपूर्ण समाजाला साधू संत सत्पुरुषच आवडतात. विशेषत: श्री ज्ञानेश्वर व श्री तुकाराम यांच्या नावांचा जयजयकार करीत समाज आनंदाने टाळ-मृदुंगासह नाचतो, डुलतो. पण त्या ज्ञानबा-तुकाराम यांनी काय सांगितले आहे याचा विचार कोण करतो ?
श्री संत तुकाराम महाराज आपल्या वाणीने सा-या समाजाला सांगतात,-
पाहू जाता एक देव l (कोणता ? तर)
ज्याने निर्मीयेले सर्व ll तो! (त्याने काय निर्माण केले ?)
चंद्र सूर्य पृथ्वी तारे l सर्व त्याचीच लेकुरे ल
अन्नपाणी तोचि देतो l  लहान थोर सांभाळितो ल
तुका म्हणे त्या देवां l  भावे भाजा करा सेवा ll
श्री तुकाराम महाराज सांगतात, कि एकाच देव आहे आणि समाज तर असंख्य देवांना भाजतो , पुजतो. तुकाराम महाराजांचा वरील अभंग वाचून वाचकांना वाटेल, कि श्रीराम व कृष्ण हे काय देव नाहीत? हा प्रश्न वाचकांच्या मनात हम्कास उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. वाचक हो आपणच विचार करा. या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच सापडेल.
श्रीराम व कृष्ण हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अत्यंत थोर पुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या देहाची काती-वाती केल्या, ते सत्यासाठीच झटले, आपली आर्याची भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी प्राणपणाने ते लढले. मातृभूमी साठी त्यांनी आपल्या प्राणाचीही तमा बाळगली नाही. अनेक वेळा घोर घोंगावून आलेल्या दुष्ट चक्रांच्या निष्ठुर वावटळी त्यांनी स्वत: च्या सामर्थ्यावर दूर करून आपल्या भारतीय संस्कृतीची ज्योत सतत तेवत ठेवली.व तिचा प्रकाश जगभर पसरविला.अशा या थोर व्यक्तीच्या स्मृती आमच्या हृदयात सतत तेवत ठेवल्या पाहिजे. आणि केवळ याच कारणासाठी आम्हाला त्यांची स्मारके बांधून व त्यांचे चारित्र्याने आमचे चारीत्र्य सुधारण्याचा व स्मृती जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे रामाचे स्मारक किंवा कृष्णाचे स्मारक म्हणजे राम किंवा कृष्ण नक्कीच नव्हेत. असे असताना ते स्मारकच देव कसा ठरतो ? त्या स्मारकानाच आम्ही आज देव समजून आम्ही त्यांचीच पूजा  किंवा सेवा करू लागलो आहोत. बरे कारे नाका सेवा, पण दिवसेंदिवस समाजाची नैतिक पातळी घसरू लागलेली आहे. मानवता पार रसातळाला जात आहे. तेव्हा परिस्थितीत आमच्या साधुसंतांनी काय शिकविले आहे त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही त्या साधुसंतांच्या शिकविण्याचे आचरण केले तरच आमच्या समाजाची पातळी सुधारेल. आमची आर्य-संस्कृती पुनश्य पूर्वी प्रमाणे बनेल. एवढेच नव्हे तर ती पुढे अनेक युगे टिकून राहील.
बाकी पुढील लेखात वाचा ..... 
हा लेख परमपूज्य सदगुरू श्री समर्थ हंबीर बाबा यांच्या जीवन कलेची साधना या ग्रंथातून घेतलेले आहे.

ख -या देवाची प्राप्ती करण्यासाठी किंवा होण्यासाठी केवळ मूर्तीपूजा किंवा व्यक्ती पूजा श्रेष्ठ नसून तो केवळ एक न संपणारा मार्ग आहे. ध्येय धरून निराकाराला किंवा निर्गुणाला  आकारात किंवा सगुणात  कसे आणता येईल ? एक निराकार त्या निराकाराला जणू शकतो.  त्यासाठी स्वतः ला  जो पर्यंत निराकारा ची आत्मा नु भूती येत नाही तो पर्यंत ह्या  मार्गाचे अनुकरण म्हणजे दिशाहीन होय.