आज आपल्या समाजात असंख्य दैवतांची प्रचंड गर्दी झालेली दिसते. कोणी रामाची भक्ती करतो तर कोणी कृष्णाची भक्ती करतो, कोण विठोबाचा धावा करतो तर कोण पांडुरंगाला हाका मारतो , कोणी म्हसोबाला भाजतो तर कोणी गणपतीला पुजतो, अशाप्रकारे या सर्व सैवातांची भक्ती करण्यामध्ये आपला समाज इतका गुंतला आहे कि त्याला खरे काय? व खोटे काय? याचा विचार करायला सुद्धा वेळ बाही, बरे साधू-संतानी काय शिकविले आहे , याचाही मुली विचारच करत नाही. संपूर्ण समाजाला साधू संत सत्पुरुषच आवडतात. विशेषत: श्री ज्ञानेश्वर व श्री तुकाराम यांच्या नावांचा जयजयकार करीत समाज आनंदाने टाळ-मृदुंगासह नाचतो, डुलतो. पण त्या ज्ञानबा-तुकाराम यांनी काय सांगितले आहे याचा विचार कोण करतो ?
श्री संत तुकाराम महाराज आपल्या वाणीने सा-या समाजाला सांगतात,-
पाहू जाता एक देव l (कोणता ? तर)
ज्याने निर्मीयेले सर्व ll तो! (त्याने काय निर्माण केले ?)
चंद्र सूर्य पृथ्वी तारे l सर्व त्याचीच लेकुरे ल
अन्नपाणी तोचि देतो l लहान थोर सांभाळितो ल
तुका म्हणे त्या देवां l भावे भाजा करा सेवा ll
श्री तुकाराम महाराज सांगतात, कि एकाच देव आहे आणि समाज तर असंख्य देवांना भाजतो , पुजतो. तुकाराम महाराजांचा वरील अभंग वाचून वाचकांना वाटेल, कि श्रीराम व कृष्ण हे काय देव नाहीत? हा प्रश्न वाचकांच्या मनात हम्कास उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. वाचक हो आपणच विचार करा. या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच सापडेल.
श्रीराम व कृष्ण हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अत्यंत थोर पुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या देहाची काती-वाती केल्या, ते सत्यासाठीच झटले, आपली आर्याची भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी प्राणपणाने ते लढले. मातृभूमी साठी त्यांनी आपल्या प्राणाचीही तमा बाळगली नाही. अनेक वेळा घोर घोंगावून आलेल्या दुष्ट चक्रांच्या निष्ठुर वावटळी त्यांनी स्वत: च्या सामर्थ्यावर दूर करून आपल्या भारतीय संस्कृतीची ज्योत सतत तेवत ठेवली.व तिचा प्रकाश जगभर पसरविला.अशा या थोर व्यक्तीच्या स्मृती आमच्या हृदयात सतत तेवत ठेवल्या पाहिजे. आणि केवळ याच कारणासाठी आम्हाला त्यांची स्मारके बांधून व त्यांचे चारित्र्याने आमचे चारीत्र्य सुधारण्याचा व स्मृती जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे रामाचे स्मारक किंवा कृष्णाचे स्मारक म्हणजे राम किंवा कृष्ण नक्कीच नव्हेत. असे असताना ते स्मारकच देव कसा ठरतो ? त्या स्मारकानाच आम्ही आज देव समजून आम्ही त्यांचीच पूजा किंवा सेवा करू लागलो आहोत. बरे कारे नाका सेवा, पण दिवसेंदिवस समाजाची नैतिक पातळी घसरू लागलेली आहे. मानवता पार रसातळाला जात आहे. तेव्हा परिस्थितीत आमच्या साधुसंतांनी काय शिकविले आहे त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही त्या साधुसंतांच्या शिकविण्याचे आचरण केले तरच आमच्या समाजाची पातळी सुधारेल. आमची आर्य-संस्कृती पुनश्य पूर्वी प्रमाणे बनेल. एवढेच नव्हे तर ती पुढे अनेक युगे टिकून राहील.
बाकी पुढील लेखात वाचा .....
हा लेख परमपूज्य सदगुरू श्री समर्थ हंबीर बाबा यांच्या जीवन कलेची साधना या ग्रंथातून घेतलेले आहे.
ख -या देवाची प्राप्ती करण्यासाठी किंवा होण्यासाठी केवळ मूर्तीपूजा किंवा व्यक्ती पूजा श्रेष्ठ नसून तो केवळ एक न संपणारा मार्ग आहे. ध्येय धरून निराकाराला किंवा निर्गुणाला आकारात किंवा सगुणात कसे आणता येईल ? एक निराकार त्या निराकाराला जणू शकतो. त्यासाठी स्वतः ला जो पर्यंत निराकारा ची आत्मा नु भूती येत नाही तो पर्यंत ह्या मार्गाचे अनुकरण म्हणजे दिशाहीन होय.

one and only place to get path of true God
ReplyDelete